मेथी आणि सुका मेव्याचे लाडू

dinkache ladoo

साहित्य –

 • १. मेथी पुड – ५०० ग्राम
 • २. डिंक – २५० ग्राम
 • ३. सुंठ – १२५ ग्राम
 • ४. पिठी साखर – ५०० ग्राम
 • ५. गुळ(कोल्हापुरी) – ५०० ग्राम
 • ६. शिंगाडा पीठ – १५० ग्राम
 • ७. रवा – ५०० ग्राम
 • ८. वेलची – २० ग्राम
 • ९. काजू – ४०० ग्राम
 • १०. किसमिस – ४०० ग्राम
 • ११. बदाम – १०० ग्राम
 • १२. वेलची पूड – १ मोठा चमचा
 • १३. तूप – १ किलो

कृती –

 • रवा २ चमचे तुपात चांगला भाजून घ्या. एका मोठ्या ताटात काढून घ्या.
 • २ चमचे तुपात सुंठ घालून ते तूप रव्याच्या मिश्रणात टाकून चांगले मिक्स करून घ्यावे.
 • २ चमचे तुपात शिंगाडा पीठ घालून ते वरील मिश्रणात घालून एकजीव करून घ्यावे.
 • २ चमचे तुपात सगळा सुका मेवा भाजून वरील मिश्रणात घालावे आणि एकजीव करून घ्यावे.
 • डिंक बारीक करून २ चमचे तुपात भाजून घ्यावे आणि रव्याच्या मिश्रणात घालून मिक्स करावे.वरील मिश्रण थंड होऊ द्यावे.
 • २ चमचे तुपात गुळ आणि वेलची पूड घालून मिक्स करून घ्यावे. त्यात मेथी पूड घालून ते रव्याच्या मिश्रणात घालून वरून साखर घालावी.
  छान एकत्र करून घ्यावे आणि लगेच लाडू वळायला सुरुवात करावी.
Write a comment