दिवाळी फराळ

दिवाळी !!! भारतात सगळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा सुंदर आणि धार्मिक सण म्हणजे दिवाळी. या सणाचा आनंद आणि उत्साह काही निराळाच. हाच उत्साह ५ दिवस जशास तसा टिकवून दिवाळ सण मंगलमय साजरा करणे यातच खरी मज्जा. दिवाळीचा तिसरा दिवस हा लक्ष्मीचा आगमनाचा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन . लक्ष्मीचा आगमनाची तयारी २ आठवडे आधी पासून च सुरु होते. घरातील सर्व मंडळीना नवीन कपडे खरीदी पासून ते दिवाळीचा फराळ पर्यंत सगळयाच गोष्टीची आतुरतेने वाट पाहतो आपण.
घरातील बायका निरनिराळ्या खमंग फराळ च्या पाककृती शोधण्यात आणि त्या आपल्या स्वयंपाक घरात प्रत्यक्ष बनवण्यात खूप व्यस्त होतात. घरातील खवैय्ये मात्र खुश होतात हे पारंपारिक फराळ खाऊन.
चला हि दिवाळी खमंग पाककृतीने सुशोभित करूयात .

Write a comment