अनारसे

4 Oct , 2015  

अनारसे रेसिपी

साहित्य :

1. किसलेला गुळ – १ कप
2. तांदूळ – १ कप
3. तूप – १ चमचा
4. तळण्यासाठी तूप किंवा तेल
5. खसखस

कृती :

1.तांदूळ ३ दिवस भिजत घालावे (रोज दिवशी पाणी बदलावे).

2. चौथ्या दिवशी चाळणीत पाघळत ठेवावे. तांदूळ नीट कोरडे करून मिक्सर मधून बारीक करून घ्यावे.

3. १ चमचा तुप त्यात किसलेला गुळ बारीक केलेले तांदूळ एकत्रं करून मळून घेऊन.तो ५-६ दिवस डब्ब्यात भरून ठेवावं (प्लास्टिकचा हवा बंद डब्बा वापरावा ).

4. ५-६ दिवसांनी ते बाहेर काढून त्याचे छोटे गोळे करून खसखसवर छोट्या पुऱ्या लाटून घ्याव्या. त्या पुऱ्या गरम तेलात सोडून तळून घ्याव्या (खसखसीची बाजू वर ठेवावी आणि पुरी तळताना ती पालटू नये नाई तर खसखस जळू शकते )

5. बऱ्याच वेळा अनारसे तळताना तो फसफसतो अशा वेळे ते कणिक परत बंद करून ठेऊन द्यावे काही दिवस.

6. अनारसे बारीक आचेवर तळून घ्यावे आणि झाऱ्यात उभे ठेवावे.

Summary

, , , , , , , , , , ,


[LoginRadius_Share]