पोह्यांचा चिवडा

5 Oct , 2015  

chivda recipe

साहित्य :

1. पातळ पोहे – ८ कप
2. कुरमुरे – दीड ते दोन कप
3. काजू – १०- १२
4. शेंगदाणे – ३/४ – १ कप
5. कढीपत्ता – १०-१२
6. हिरव्या मिरच्या – १०-१२
7. हिंग – १/२ चमचा
8. हळद – १ चमचा
9. मोहोरी – १/२ चमचा
10. जिरे – १/२ चमचा
11. मीठ, साखर – चवीनुसार
12. सुक्या खोबऱ्याचे पातळ काप

कृती :

1.चिवडा कुरकुरीतच पाहिजे नाही तर मज्जा नाही. त्यासाठी पोहे जाड तळाचा भांडयात ५-६ मिनिट आणि कुरमुरे २-३ मिनिट भाजून घ्यावे . (पोहे आणि कुरमुरे सारखे ढवळत राहावे )

2. ते एका भांड्यात काढून घ्यावे आणि कढाई मध्ये तेल गरम करून त्यात शेंगदाणे, काजू आणि सुक्या खोबऱ्याचे पातळ काप तळून घ्यावे.

3. त्याच तेलात फोडणीसाठी मोहोरी, जीर, मिरची, कढीपत्ता घालावे. त्यात तळलेले शेंगदाणे, काजू, सुक्या खोबऱ्याचे पातळ काप घालून पोहे आणि कुरमुरे घालून सगळ्या पोह्यला तेल लागे पर्यंत एकत्र करून घ्यावे. गॅस कमी ठेवावा.

4. आता गॅस बंद करून चवीनुसार मीठ आणि साखर टाकावे. व्यवस्थित ढवळून घ्यावे.

, , , , , , , , , , ,


[LoginRadius_Share]