भाजणी चकली

chakali recipe in marathi

भाजणीच्या चकलीचे साहित्य

1. अर्धा कप उडीद डाळ
2. दीड कप चणा डाळ
3. २ कप तांदूळ (स्वछ धुतलेलं )
4. अर्धा कप मुग डाळ
5. १/४ कप जिरं
6. १/४ कप साबुदाणा
7. थोडेसे धने(मुठभर)
8. तिखट, मीठ , चिमुट भर खाण्याचा सोडा, ओवा
9. पाणी, तळण्यासाठी तेल

भाजणी बनवण्याची कृती :

1. साहित्यात दिलेल्या सगळ्या डाळी स्वच्छ पाण्याने वेग वेगळ्या धुवून घेऊन वेग वेगळ्या वाळत घालाव्या (वाळावण्यासाठी सुती कपडा वापरावा)

2. सर्व डाळी भाजून घ्याव्या(ब्राऊन कलर येईल तोपर्यंत). तांदूळ आणि साबुदाणा वेग वेगळा भाजावा. त्या नंतर जिरे भाजून घ्यावे

3. आता सर्वे जिन्नस जे जे आपण भाजून घेतले आहे ते एकत्र करून थंड करून घ्यावे आणि बारीक दळून घ्यावे.

चकली कृती :

1. जेवढ्या कणकेचे चकली बनवायचे आहेत तेवढे कणिक कढाईत घ्या . त्यात तेलाचे मोहन, चवि प्रमाणे तिखट, मीठ , चिमुट भर खाण्यचा सोडा, ओवा टाकून मिक्स करून घावे.

2. पातेल्यात थोडे पाणी गरम करून घ्यावे. त्या पाण्यचा वापर करून वरील कणिक मळून घ्यावे. (कणिक जास्त घट्ट किंवा जास्त सैल सुद्धा नको ).

3. आता चकलीचा साचा घेऊन त्याला आतून तेल लाऊन भिजवलेली थोडी कणिक टाकून साचा व्यवस्थित बंद करवे आणि चकल्या पाडून घ्याव्या .

4. कढई मध्ये भरपूर तेल गरम करून घ्यावे. तेल नीट तापल्यानंतर मंद आचेवर ठेऊन चकल्या खरपूस तळून घ्याव्या .

Write a comment