रवा आणि ओल्या नारळाचे लाडू

3 Oct , 2015  

ladu

साहित्य :

1. बारीक रवा – २ वाट्या
2. साखर, पाणी
3. तूप – ४-५ चमचा
4. बेदाणे
5. वेलची पूड

कृती :

1.रवा मध्यम आचेवर हलकासा भाजून घ्यावा. सारखा ढवळत राहावा जेणे करून तो जळणार नाही.

2. रवा ताटात काढून त्यात खवलेला नारळ घालून चांगले मिक्स करून घ्यावे आणि १० मिनिट तसेच ठेवावे (नारळाचा ओलसर पणा रव्यात उतरेल )

3. कढाईत तूप घालून गरम करून घ्यावे त्यात वरील मिश्रण घालून चं परतून घ्यावे जो पर्यंत रवा आणि तुपाचा खमंग सुगंध येत नाही तो पर्यंत .

4. साखर आणि पाणी एकत्र करून उकळू द्यावे जो पर्यंत एक तारी पाक तयार होत नी (टिप – साधारण ३-४ मिनिटांनी एक थेंब बोटावर घेऊन उघडझाप करावी तिथे एक तार दिसली कि पाक तयार झाला आहे)

5. लगेच तो पाक रव्याचा मिश्रणात टाकावा. सुरवातीला ते थोडे पातळ दिसेल पण नंतर ते घट्ट होईल . त्यात वेलची पूड टाकावी आणि ते आळे पर्यंत मिक्स करत रहावे .

6. मिश्रण आळले कि लाडू वळावे आणि त्यावर एक बेदाणा लावावं .

, , , ,


[LoginRadius_Share]