Ganpati Naivedya recipes

5 Sep , 2016  

गणेशोत्सव – अतिशय सुंदर, उत्साही आणि आनंददायी उत्सव. संपूर्ण महाराष्ट्र हे १० दिवस वेगळ्याच जोशात पाहायला मिळतो. रस्त्याने चालताना ऐकू येणारा तो ढोल ताशांचा आवाज, वेगवेगळ्या पद्थतीने सजवलेल्या गणेशाची सुंदर मूर्ती आणि सामाजिक संदेश देणारा अप्रतिम देखावा पाहून मन एकदम शांत होते. गणेशाला सजवणे अत्ताच्या काळात काही अवघड नाही पण त्याचसोबत प्रत्येकाची सजवण्याची कल्पना सुद्धात तेवढीच आगळी. गणरायाच्या मुकुटापासून तर त्यांचा वाहनापर्यंत सगळेच बाहेर अगदी सहज उपलब्ध आहे पण स्वताहून की तरी करण्याचा हुरूप वेगळाच.बाप्पा येणार हा आनंद तर फारच मोठा असतो पण त्याहून जास्त आनंद याचा असतो कि बाप्पा सोबत आपल्याला हि रोज गोड गोड पदार्थ प्रसादच्या स्वरुपात खायला मिळेल. रोजचाच प्रश्न असतो आज प्रसादाला काय बनवूया? गणेशाचा कालखंडातील मिष्टान्नाचा सम्राट “मोदक ” म्हणजे महाप्रसादच मानला जातो. त्याला टाळून तर अजिबात नाही चालणार पण प्रसादात पण नाविन्य पाहिजे ना? चला या वर्षी बाप्पाला मोदक सोबत अजून वेगवेगळ्या मिश्टानानी खुश करूयात आणि आपण हि त्याची मजा लुटूयात.

ukdiche-modak

साहित्य –
उकड बनवायचे साहित्य
१. १/२ कप तांदळाचे पीठ
२. २/३ कप पाणी
३. चिमुटभर मीठ
४. १ चमचा तूप/ तेल
उकड बनवण्याची कृती –
१. २/३ कप पाणी उकळून त्यात चवीनुसार मीठ, थोडे तूप घालून त्यात तांदळाचे पीठ घालून चांगले ढवळा.
२. त्यावर झाकण ठेऊन १० minute तसेच ठेवा.
मोदकाची कृती –
१. सारण बनवण्यासाठी नारळ खवून घ्यावा. प्रमाणासाठी एक स्टीलची वाटी घ्यावी. जितकया वाट्या खवलेला नारळ असेल त्याच्या निमपट किसलेला गूळ घ्यावा.पातेल्यात खवलेला नारळ आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर ढवळत राहावे. गूळ वितळला कि वेलची पूड घालावी. ढवळून बाजूला ठेवून द्यावे.
२. एका मोठ्या ताटात उकड काढून घ्यावी आणि ती चांगली मळून घ्यावी. उकड मळताना त्यात थोडे तेल आणि गरम पाण्याचा हाथ लाऊन उकड चांगली मऊसर मळावी .
३. त्याचे छोटे गोळे लारून त्याची पारी करावी. त्यात १ चमचा सारण भरून पारी चुण्या कराव्यात. त्या चुण्या एकत्र आणून मोदकाचा आकार द्यावा
४. मोदकपात्रात पाणी उकळत ठेवावे त्यातल्या चाळणीत स्वच्छ धुतलेला सुती कपडा टाकावा त्यावर मोदक ठेवून झाकण लाऊन द्यावे आणि १०-१२ minute वाफ काढावी.
५. नंतर झाकण उघडून गरम गरम मोदक प्रसादासाठी ठेवावे.

04-pinepple-sheera

साहित्य –
१. १ वाटी जाड रवा
२. अननसाच्या फोडी
३. साजूक तूप
४. १ वाटी साखर
५. १ १/२ वाटी दुध
६. १/२ वाटी पाणी
कृती –
१. जाड कढईत तूप घालून रवा खमंग भाजून घ्यावा.
२. अननसाच्या फोडी बारीक करून त्याची paste करून घ्यावी.
३. एका भांड्यात थोडे तूप घालून त्यात अननसाची paste परतून घ्यावी.
४. दुसऱ्या भांड्यात थोडे दुध आणि पाणी मंद आचेवर तापवत ठेवावे .
५. तुपात परतलेली अननसाच्या paste मध्ये रवा घालून चांगला एकजीव करून २-३ मिनिट परतून घ्यावा.
६. दुध आणि पाण्याला उकळी आलेली असेल ते मिश्रण रव्यात घालावे. रवा फुगून येईल मग झाकण ठेऊन वाफ काढावी.
७. त्या नंतर त्यात साखर घालून चांगले मिक्स करून त्यावर झाकण ठेऊन वाफ येऊ द्यावी. वरून सुका मेवा घालावा.

03-kaju-katli

साहित्य –
१. १ किलो काजू
२. वेलची
३. साखर
४. चांदीचा वर्ख
५. पिठीसाखर
कृती
१. काजू बारीक कुटून त्याची पूड करून घ्या. साखरेचा एक तारी पाक करून त्यात वेलची पूड आणि काजू ची पूड घालावी.
२. मिश्रण आटत ठेवावे. मधून मधून हलवत राहावे. मिश्रण चांगले घट्ट झाले कि नीट गोल होई पर्यंत घोटत राहा . त्यात थोडी पिठी साखर घालून हलून घ्या.
३. ताटाला तुपाचा हाथ फिरवून त्यावर मिश्रण थापून घ्यावे . त्यावर चांदीचा वर्ख लाऊन त्याच्या वड्या कापून घ्याव्या.

06-cocnut-barfi

साहित्य –
१. १ नारळ
२. ३५० ग्राम साखर
३. तूप
४. वेलची पूड
कृती
१. एक आख्खे नारळ खोउन घ्यावे (त्यातले काळसर भाग सोडून).
२. कढई मध्ये २-३ चमचे तूप घ्यावे ते गरम झाले कि त्यात खोवलेले नारळ घालून मंद आचेवर चांगले परतून घ्यावे .
३. ३-४ मिनिटांनी त्यात साखर घालून मंद आचेवरच ढवळत रहावे.
४. १ चमचा वेलची पूड टाकून मिश्रण घट्ट होई पर्यंत ढवळत राहावे.
५. एका मोठ्या ताटाला तूप लाऊन मिश्रण त्यात ओतून घ्यावे. एका वाटीच्या तळाला तूप लाऊन ते मिश्रण एकसारखे करून घ्यावे.
६. मिश्रण गरम असतानाच हलक्या हाताने वड्या पाडून घ्याव्या.
७. मिश्रण थंड झाले कि वड्या काढून घ्याव्या.

05-besan-laddu

साहित्य –
१. १ १/२ कप बेसन
२. तूप
३. ३/४ कप पिठीसाखर
४. वेलची पूड
५. वाटी भर दुध
६. बेदाणे आणि सुका मेवा (तुकडा)
कृती
१. तूप गरम करून त्यात रवा खमंग भाजून घ्यावा, भाजताना सारखे ढवळत राहावे म्हणजे रवा तळाला लागून जाळणार नाही.
२. बेसन भाजताना खमंग वास आला कि समजावे कि बेसन नीट भाजल्या गेले आहे नंतर आंच बंद करावी. नंतर त्यावर दुधाचा हबका मारावा. (दुधामुळे आधी बेसन थोडे फसफसेल आणि नंतर घट्ट होईल.)
३. बेसन लगेच दुसऱ्या भांड्यात काढून घ्यावे. १५-२० मिनिटांनी त्यात सुका मेवा, बेदाणे, वेलची पूड घालून माळून घ्यावे आणि थंड झाले कि त्याचे लाडू वळावे.

02-fried-modak

साहित्य –
१. १/२ कप खिरापत
२. १/२ कप मैदा
३. १/२ बारीक रवा
४. चवीनुसार मीठ
५. तळण्यासाठी तेल किंवा तूप
कृती –
१. रवा आणि मैदा एकत्र करून घ्यावा त्यात २ चमचा तेल (कडकडीत गरम केलेलं ) मोहन घालावे. चावि पुरते मीठ घालून हाताने मिक्स करून घ्यावे. थोडे पाणी घालून घट्ट माळून घ्यावे. त्या नंतर अर्धा तास ते झाकून ठेवावे.
२. अर्ध्या तासाने पीठे परत माळून त्याचे छोटे गोळे बनवावे. त्याची पारी बनवून त्यात मध्ये थोडा खोल जागा करून त्यात १ चमचा सारण भरून त्याच्या सर्व बाजूने चुण्या ओअदुन त्या हाताने एकत्र करून मोदकाचा आकार देऊन १ थेंब दुधाचा बोट लाऊन कळी नीट बंद करून घ्यावी.
३. सर्व मोदक मंद आचेवर तेलात किंवा तुपात खुर्पूस टाळून घ्यावे.

09-motichur-laddu

साहित्य –
१. २ कप बेसन
२. ३/४ कप साखर
३. खाण्याचा केशर रंग
४. तूप
५. वेलची पूड
६. बदामाचे काप
कृती –
१. बेसन पाण्यात मिसळून घट्ट मिश्रण तयार करून घ्यावे. त्यात केशर रंग टाकावा.
२. कढई मध्ये तूप गरम करून त्यात चाळणीने बेसन पाडून बुंदी करून घ्यावी.
३. काढई मध्ये सम प्रमाणात पाणी आणि साखर घेऊन साखरेचा एक तारी पाक करून घ्यावा.
४. त्यात वेलची आणि बुंदी आणि बदामाचा काप घालून एकत्र करून घ्यावे.
५. मिश्रण त्याचे लाडू वळावे.

08-anarase

साहित्य –
1. किसलेला गुळ – १ कप
2. तांदूळ – १ कप
3. तूप – १ चमचा
4. तळण्यासाठी तूप किंवा तेल
5. खसखस
कृती –
1.तांदूळ ३ दिवस भिजत घालावे (रोज दिवशी पाणी बदलावे).2. चौथ्या दिवशी चाळणीत पाघळत ठेवावे. तांदूळ नीट कोरडे करून मिक्सर मधून बारीक करून घ्यावे.

3. १ चमचा तुप त्यात किसलेला गुळ बारीक केलेले तांदूळ एकत्रं करून मळून घेऊन.तो ५-६ दिवस डब्ब्यात भरून ठेवावं (प्लास्टिकचा हवा बंद डब्बा वापरावा ).

4. ५-६ दिवसांनी ते बाहेर काढून त्याचे छोटे गोळे करून खसखसवर छोट्या पुऱ्या लाटून घ्याव्या. त्या पुऱ्या गरम तेलात सोडून तळून घ्याव्या (खसखसीची बाजू वर ठेवावी आणि पुरी तळताना ती पालटू नये नाई तर खसखस जळू शकते )

5. बऱ्याच वेळा अनारसे तळताना तो फसफसतो अशा वेळे ते कणिक परत बंद करून ठेऊन द्यावे काही दिवस.

6. अनारसे बारीक आचेवर तळून घ्यावे आणि झाऱ्यात उभे ठेवावे.

Summary
GANPATI NAIVEDYA RECIPES
Article Name
GANPATI NAIVEDYA RECIPES
Description
गणेशोत्सव – अतिशय सुंदर, उत्साही आणि आनंददायी उत्सव. संपूर्ण महाराष्ट्र हे १० दिवस वेगळ्याच जोशात पाहायला मिळतो. रस्त्याने चालताना ऐकू येणारा तो ढोल ताशांचा आवाज, वेगवेगळ्या पद्थतीने सजवलेल्या गणेशाची सुंदर मूर्ती आणि सामाजिक संदेश देणारा अप्रतिम देखावा पाहून मन एकदम शांत होते. गणेशाला सजवणे अत्ताच्या काळात काही अवघड नाही पण त्याचसोबत प्रत्येकाची सजवण्याची कल्पना सुद्धात तेवढीच आगळी. गणरायाच्या मुकुटापासून तर त्यांचा वाहनापर्यंत सगळेच बाहेर अगदी सहज उपलब्ध आहे पण स्वताहून की तरी करण्याचा हुरूप वेगळाच.बाप्पा येणार हा आनंद तर फारच मोठा असतो पण त्याहून जास्त आनंद याचा असतो कि बाप्पा सोबत आपल्याला हि रोज गोड गोड पदार्थ प्रसादच्या स्वरुपात खायला मिळेल
Author
NashikFame

, , , , , , , , , , , , , , ,


loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

[LoginRadius_Share]