रंग काढण्याचे घरगुती उपाय

खर बघायला गेले तर होळी आणि रंगपंचमी या मधला फरक कळतो तो नाशिककरानाच. होळी म्हणजे लाकूड आणि गौऱ्या आणि रंगपंचमी म्हणजे रंगांची उधळण. रंगपंचमी हि अगदीच जवळ आली आहे, सर्व जन त्या गडबडीत आहे. मुल विचार करताय रंग कुठून आणायचा आणि कुठला आणायचा कि घरीच बनवायचा तर मुली विचार करताय कि रंग तर खेळायचा आहे पण त्या नंतर स्कीन आणि केसांचे हाल…..

Related – रंग खेळायला जाताय? हे नक्की वाचा

किती हि साधे रंग घेतले तरी त्या मध्ये मायका आणि लेड सारखे रसायन असतातच त्या मुळे केस आणि स्कीन चे प्रचंड नुकसान होते. मात्र आता हेच रंग अगदी सहजरित्या काढू शकतात आणि केस आणि त्वचा हेल्दी राहते.

1

दही सोबत मध

दही आणि मधाचे मिश्रण चेहऱ्यावर लावून मालिश करा. रंग अगदी सहज निघून जातो. आणि त्वचेवर काही परिणाम होत नाही.

2

पीठ + मध + गुलाब पाणी + हळद

रंग काढल्यानंतर त्वचेची आग होते त्या पासून अगदी सहज सुटका होते या लेप मुळे.

3

२ चमचे कच्चे दुध + १ चमचा खोबरेल तेल + हळद

याचे मिश्रण चेहऱ्यावर लाऊन मसाज केल्याने रंग अगदी हळुवार निघून जातो.

4

केस मुलायम

अगदी महत्वाचे म्हणजे रंग खेळल्यानंतर दुसऱ्या दिवशी ओलिव्ह ओईल कोमट करून केसांची मालिश करा आणि एक तासानंतर धुवून टाका. या उपायाने केसातून सगळा रंग निघून जाईल आणि केस मउ राहतील.

आता रंग खेळा मनसोक्त. रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण… रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा

Write a comment