Ganesh Chaturthi Decoration Ideas: १० दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवात लोक आपापल्या सोयीनुसार बाप्पाला घरी आणतात. कोणी दीड दिवस तर कोणी पाच दिवस बाप्पाला घरी आणतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पाचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले जाते. आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार म्हटल्यावर घरोघरी साफसफाई, डेकोरेशनची तयारी सुरू झाली आहे. बाप्पांच्या स्वागताची तयारी करताना ते काही दिवस राहणार ती जागा सुशोभित करणे ही एक महत्त्वाची गोष्ट असते. बाजारातून प्लास्टिकचे काहीतरी महागडे आणून आपण नेहमीच डेकोरेशन करतो पण त्याने पर्यायवरणावर देखील वाईट परिणाम होतात. त्यापेक्षा आपण घरच्या घरी थोडी कल्पकता वापरून छान सुटसुटीत असे डेकोरेशन करू शकतो. पण काय करायचे हे आपल्याला अनेकदा सुचत नाही. त्यासाठीच गणपती डेकोरेशनचे काही सोप्या आयडिया (Homemade Ganpati Decoration Ideas) पाहूया.

रंगीत कागदांचा वापर

गणपती बाप्पाच्या डेकोरेशन साठी रंगीत कागदांचा वापर करू शकतात. या कागदाच्या साहाय्याने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स बनवू शकतात. याच कागदांच्या मदतीने विविध प्रकारचे व आकाराचे फुले आणि फुलपाखरे सुद्धा बनवू शकतात.

झेंडूच्या फुलांचा वापर

झेंडूच्या फुलांची सजावट खूप सुंदर दिसते. या दोन रंगात येणाऱ्या फुलांचे मिश्रण करून याचे डेकोरेशन खूप छान होते. यासोबत हिरव्या पानांच्या माळेने सजावट आणखी आकर्षक दिसते.

दुपट्टयांचा वापर

ओढणी किंवा साडी यांनी सुंदर सजावट करता येते. वेगवेगळ्या रंगांचे दुपट्टे घेऊन त्यांना बॅकड्रॉपसारखे सेट करता येत. शिवाय तुम्ही यांना वेगवेगळ्या प्रकारे लावू  शकतात.

दिव्यांचा वापर

तुम्ही दिव्यांचा वापर करून छान डेकोरेशन करू शकतात. याने सजावटीला वेगळा लुक मिळतो. तेलाचे दिवे न लावता इलेक्ट्रिक दिव्यांचा वापर करू शकतात. शिवाय विविध रंगांची लायटिंग सुद्धा आकर्षक दिसते. 

इको फ्रेंडली वस्तूंचा वापर

नेहमीचे टिपिकल फुलांचे, कागदाचे डेकोरेशन नको असेल तर थोडे वेगळे आणि हटके डेकोरेशन आपल्याला नक्कीच करता येऊ शकते. यामध्ये फक्त विटा, दिवे आणि काही रोपांचा वापर करू शकतात.